Wednesday, November 21, 2007

आम्ही तुफानातले दिवे.

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.


हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे.


हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्‍याने मावळणारी जात आमुची नव्हे.


तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.


काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.


एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.


जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.


लोकशाहीर वामनदादा कर्डक.

20 comments:

GAUTAM WAVHAL said...

Nice

श्रीयोग said...

अप्रतिम 👌🙏

Unknown said...

Mala khup avdli

Anonymous said...

खुप छान काव्यपंक्ती आहेत दादा

Anonymous said...

खूप छान ओळी आहे या काव्याच्या खूप काही शिकवून जातात 👌🏻🙏🏻

Anonymous said...

🔥🔥🔥

Anonymous said...

खूप छान 👌🏻

Anonymous said...

❤️

Anonymous said...

या गीताने खुप खूप ऊर्जा मिळते 🙏

Anonymous said...

संघर्ष प्रेरित गीत... 🤙💙

Anonymous said...

माझ्याकडे काही भीम गीत आहे स्वतः मी लिहिलेले मला ते रिलीज करायचे आहे पण कसे करावे

Anonymous said...

तुफान

Anonymous said...

❤️

Anonymous said...

जय भिमराया!

Anonymous said...

जय भिमराया!

Anonymous said...

जबरदस्त

Anonymous said...

जबरदस्त गीत

Anonymous said...

Extraordinary motivate people

Anonymous said...

कवितेतील शब्द इतके प्रभावी आहेत की ते तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रेरणा देतात.

Anonymous said...

Waah waah dada waah, me bauddha nahi aahe pan, tumche sagle gaane khup changle astat, mala khup avdtat