सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?
घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?
न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?
लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?
इथ बिऱ्हाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?
इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?
शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?
लोकशाहीर वामनदादा कर्डक
Saturday, December 1, 2007
आमचा वाटा
प्रकाशक : अमोल शिरसाट वेळ : 11:37:00 PM
Subscribe to:
Post Comments (Atom)
17 comments:
अतिशय सुंदर. धन चोरांचा पळण्याचा फाटा कुठाय हो . हाच तर फाटा शोधायचाय.
प्रिय अमोल,
तू एक फार मोठं काम केलंस :
वामन दादांची चळवळीची गाणी अनेक वर्षे ऐकत होतो. तू त्यांची संहिता ई-वाचकांना उपलब्ध करून दिलीस.
मन:पूर्वक अभिनन्दन.
- डॉ.श्रीकृष्ण राऊत
प्रिय अमोल,
सप्रेम जयभिम.
मी गेली कित्येक दिवसांपासून वामन दादांविषयीचा ब्लाग/वेब साइट शोधत होतो. थकलो, कंटाळलो पण शेवटी जिंकलो. तुमच्या ह्या ब्लागचा फायदा कसा झाला हे नंतर सांगेल. सद्या तुमच्या ह्या प्रयत्नांना व संग्रहाला लाख सलाम. काही मदत हवी असल्यास कळवा.
फार उत्कृष्ठ ब्लाग आहे. वामनदादांचा संग्रह म्हणजे काही विचारायलाच नको. माझ्या सारख्यांना ऑनहँड वापरायला खुप मदत झाली आहे. धन्यवाद!
अशोक वानखडे
मुंबई
Ashok-wankhade2004@yahoo.com
Jaibheem,
Its great work dear. Keep it up
Thanks
thanks to all of you
I was listening to the Chakravyuva Song - which is creating ripples in India Inc, and I realized that though the words are in Hindi - it not only echoes same thought - but probably it is inspired from Wamandada's Song only , Have a look at it ...
वाह अमोल वाह
Nice work sir
bahut badhiya song aahe. it is a great song ever and ever... thank you.
KraKrantikaari jai bhim
Great
jay bhim
Very good work....
Vaman dada sarkha Kavi manje vadal vatetil Sahara...
Bach shodh ahe
जय भीम सर
जय..��..भीम दादा ��������
Post a Comment