तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे.
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्याने मावळणारी जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.
लोकशाहीर वामनदादा कर्डक.
Nice
ReplyDeleteअप्रतिम 👌🙏
ReplyDeleteMala khup avdli
ReplyDeleteखुप छान काव्यपंक्ती आहेत दादा
ReplyDeleteखूप छान ओळी आहे या काव्याच्या खूप काही शिकवून जातात 👌🏻🙏🏻
ReplyDelete🔥🔥🔥
ReplyDeleteखूप छान 👌🏻
ReplyDelete❤️
ReplyDeleteया गीताने खुप खूप ऊर्जा मिळते 🙏
ReplyDeleteसंघर्ष प्रेरित गीत... 🤙💙
ReplyDeleteमाझ्याकडे काही भीम गीत आहे स्वतः मी लिहिलेले मला ते रिलीज करायचे आहे पण कसे करावे
ReplyDeleteतुफान
ReplyDelete❤️
ReplyDeleteजय भिमराया!
ReplyDeleteजय भिमराया!
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteजबरदस्त गीत
ReplyDeleteExtraordinary motivate people
ReplyDeleteकवितेतील शब्द इतके प्रभावी आहेत की ते तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रेरणा देतात.
ReplyDeleteWaah waah dada waah, me bauddha nahi aahe pan, tumche sagle gaane khup changle astat, mala khup avdtat
ReplyDelete