Saturday, December 1, 2007

भीमा तुझ्या मताचे

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.


वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.


गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्‍याचे दुसरेच टोक असते.


तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.


सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.


वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया क्रुतिप्रमाणे सारेच नेक असते.


लोकशाहीर वामनदादा कर्डक.

16 comments:

Unknown said...

It's very good initiative taken to promote Dada's Poeam's on global platform... Entire Indian Buddhiest/Ambedkar's so much like these burning experiances of our society and provide us motivational boostup to fight against injustice...

Subodh...
9766840360

Amol NW said...

JaiBhim Amol!!!
Thanks for the blog. I have added this url onto http://www.navayan.com - Homeland of Ambedkarite Buddhist.
Keep it up

Amol NW

अमोल शिरसाट said...

thanks for appreatiating!

rkjumle said...
This comment has been removed by the author.
rkjumle said...

अमोल शिरसाट,
सप्रेम जयभिम,
वामनदादा कर्डकचे गाणे या ब्लॉगवर पाहून मी खरोखर खुष झालो.“अशा होत्या त्या काटेरी वाटा” या माझ्या आत्मकथनातील कथा http://rkjumlechyakatha.wordpress.com‎ या लिकवर पाहावे.तसेच लेख http://rkjumle.wordpress.com या लिंकवर आहेत.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
आर.के.जुमळे, अकोला

Datta Jawale said...

सप्रेम जयभीम अमोल

आपण हे ब्लोग तयार करून खूप चांगले झाले.

बऱ्याच लोकांना कळतील वामन दादाचे बोल कळतील जस कि,
{ भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.}

धन्यवाद !

Anonymous said...

Nice Work
pramod.walke@yahoo.co.in

Unknown said...

Very nice........Jay bhim Jay bharat

Unknown said...

आम्ही जगू नव्याने मारणास झुंज देऊ,
झेलून वार सारे आम्ही जिवंत राहू.
हही कविता कुना कडे असेल तर कृपया सादर ब्लाँग वर शेअर करावी.जय भीम

गजानन धामणे said...

अजरामर गीत

Unknown said...

खूप छान🌷🌷जयभीम🌷🌷

Unknown said...

जय भिम
खूप छान कविता
वामन दादा कर्डक साहेब

Unknown said...

great man wamhn dada

कालध्वज - एक शायर said...

Jay bheem

Unknown said...

Jay bhim

Unknown said...

jay bhim