Thursday, February 14, 2008

चांदण्याची छाया कापराची काया

चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया....

चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....

बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया....

झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया.....

लोकशाहीर वामनदादा कर्डक

16 comments:

  1. Nice effort....wamandadan war ekhada lek pan taka na...

    ReplyDelete
  2. My Blog
    http://www.wretch.cc/blog/markacey
    Nice to meet you

    ReplyDelete
  3. Nice.......... Jay bhim.............

    ReplyDelete
  4. थांबा हो थांबा गाडी वालं दादा
    बाळ ऐकटा मी भिमा माझं नाव
    राहीले फार दूर माझ गांव
    गाडीत घ्या हो मला...............||धृ||

    तापत्या उन्हाने जळती पाय माझे
    पाठीवरती आहे दफ्तराचे अोझे
    हा भयान वारा तन माझे भाजे
    घावते वघळते लय ताजे ताजे
    येऊद्या जरा हो मज पामर्य‍ाशी
    बसूनी घ्या मला घ्या मला................||1||

    गाडी वालं बोले जात सांग बाळा
    दिसतो खरोखर लय साधा भोळा
    भिमा बाळ बोले महार मि वेडा
    गाडी वाल बोले थांब बाळ थोडा
    बाटेल माझे गाडी अन मी
    कसं रे घेऊ मी तूला..................||2||

    उपक‍ार तुमचे विसरनार नाही
    देतो तुम्हाला हि मनाची ग्वाही
    सांगनार नाही कूणाला कदाही
    जीव झाला म‍ाझ‍‍ा लय लाही लाही
    वामन माझी वाट तो पाही
    बसूनी घ्या मला घ्या मला...............||3||

                 ---   वामन दादा कर्डक.

    ReplyDelete
  5. Very nice song
    Krantikary Jay bhim

    ReplyDelete
  6. Super kharach vaman dada sarkhe kavi punha hovu shaknaar naahi

    ReplyDelete
  7. MI varil 2 hi geete majhya mulala jhopavnysathi roj gaato .tumchya karyas majha kraantikaari jay Bhim

    ReplyDelete
  8. Siddharth nagar Purna taluka jilha parbhani yethil rahivaasi aahe mi majha naav kiran kumar Vijay Gaikwad asun 15augast 2015 roji mi swatha vaaman Dada kardak jayanti pahilyaanda saajri keli aani aata hi dar varshi saajri karto .vaaman dada kardak saarkhe kavi aata hone shaky nahi

    ReplyDelete
  9. जय भिम खुप छान गानि आहेत वामन दादा चि

    ReplyDelete
  10. Jay bhim chan bhau 💙

    ReplyDelete